Advertisements
Advertisements
प्रश्न
चित्र पाहा. संवाद वाचा.
आई: | अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग? |
जाॅर्डन: | आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? |
आई: | मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा. |
जाॅर्डन: | अगं हो, पण आता काय करू ते सांग ना! |
आई: | यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर. |
जाॅर्डन: | आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? |
आई: | हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे. |
जाॅर्डन: | आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं? |
आई: | तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया. (आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.) |
जाॅर्डन: | आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. |
आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे काेणते फायदे होतील, असे तुम्हांला वाटते?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
अ. पैशांची बचत होईल.
ब. कपड्यांची निगा राखणे सोपे होईल.
क. कपाटात कमी जागेत मावतील.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?