Advertisements
Advertisements
प्रश्न
चित्र पाहा. संवाद वाचा.
नीता: | आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. |
आजी: | हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. |
नीता: | जलपर्णी म्हणजे काय गं आजी? |
आजी: | पाण्यात उगवणारी वनस्पती. |
नीता: | ती पाण्यात का उगवते? |
आजी: | पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते. |
नीता: | आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना! |
आजी: | हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदुषणाची निदशर्क आहे. |
नीता: | अरेरे! आजी, आता याजलपर्णीचं काय करायचं? |
आजी: | पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. |
जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
लघु उत्तर
उत्तर
जलपर्णी उगवल्याने नदीचा प्रवाह मंदावतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याच्या क्रियेचा वेगही कमी कमी होत जातो. अशाने नदीतील जलचर दगावतात. पाण्याचा खुंटलेला प्रवाह व पाणी स्वच्छ ठेवणारे जलचर मेल्याने पाणी दूषित होते. यामुळे, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. जलपर्णीची वाढ ही प्रदूषणाची निदर्शक आहे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?