Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
- प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे?
- स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
- ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे?
- स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे?
- भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती?
दीर्घउत्तर
उत्तर
- प्राथमिक व्यवसायामध्ये ब्राझील (१०%) च्या तुलनेत भारतातील (४८.८%) लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे (४८.८%).
- भारताच्या (५७%) तुलनेत ब्राझीलचे (६७%) स्थूल आंतरदेशीय उत्पादनामध्ये तृतीयक क्षेत्राचे योगदान जास्त आहे.
- स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा भारताच्या (२६%) तुलनेत ब्राझील देशाचा (२७.५%) जास्त आहे.
- ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायात जास्त लोकसंख्या (७१%) कार्यरत आहे.
- स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान ६७% आहे, तर भारताचे ५७% आहे.
- भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी २६.९% आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?