Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
उत्तर
माझ्या जीवनात विनोदाचे महत्त्व
प्रत्येकाला वाटत असते की, आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व आनंदी राहावे परंतु हे शक्य नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख येतात. सुखामध्ये सर्वजण आपल्या सोबत असतात मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी, कुटुंबातील तसेच समाजातील इतर लोकही सुखामध्ये सोबतीला असतात परंतु जेव्हा दुःखाचा डोंगर आपल्यावर ओढतो तेव्हा मात्र आपल्याजवळ उरतो ते केवळ विनोद. अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असतानांही आपल्या आजूबाजूला जर आपण विनोद वाचला किंवा ऐकला असेल तर आपले चटकन लक्ष त्याकडे खेचली जाते व चेहऱ्यावरील दुःख विसरून आपण खदखदून हसतो व आपला चेहरा काही वेळ का होईना परंतु हास्य आपल्या ओठांवर येते. वास्तव सुसह्य फक्त ‘विनोद’च करू शकतो. कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते. ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!
या हसण्याच्या गरजेमुळे हास्य-क्लबची अनेक ठिकाणे स्थापन झाली आहेत. यावरून हसणे किती गरजेचे आहे हे कळते. या हसण्यासाठी आपणाला विनोदाची फार गरज पडते. त्यामुळे सुखी जीवनासाठी विनोद गरजेचाच आहे. विनोद नसेल तर माणसाचे मन चिंताग्रस्त राहील. कठीण परिस्थितीत तसेच ते वाईट गोष्टींच्या आहारी जाईल आणि यातून मला दारूसारख्या व्यसनांची निर्मिती होईल. तेव्हा मन प्रसन्न पाहिजे आणि त्यासाठी विनोद हा माणसाला मदत करतो. पण हा विनोद काही मर्यादेपर्यंत बरा असतो. याने मर्यादा ओलांडली की दुसऱ्याचे दोष काढले जातात आणि मग यातून भांडणे व मारामाऱ्या असे प्रकार घडतात.
काही झाले तरी विनोद हा ठरावीक पातळीपर्यंत आवश्यक आहे. नाटकामध्ये, सिनेमामध्ये विनोदासाठी विनोदी पात्रे आवर्जून घेतली जातात. त्यामुळे त्या कथेतील कंटाळा दूर होतो. तसेच कविता, कथा, वाङ्मय यामध्येसुद्धा चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, बाळ गाडगीळ यांनी आपली विनोदीबुद्धी वापरून त्या-त्या कथानकांना तरतरी आणली. पु. ल. देशपांडे यांचे विनोद तर खळखळून हसवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा जीवनामध्ये विनोद महत्त्वाचाच आहे. जीवनात सतत येणारे नैराश्य या विनोदानेच घालविले जाते. म्हणून नेहमी हसत राहा, आनंदी राहा.