मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. (अ) सहभागात्मक (ब) पारदर्शकता (क) प्रतिसादात्मक (ड) उत्तरदायित्व - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा.

(अ) सहभागात्मक 

(ब) पारदर्शकता 

(क) प्रतिसादात्मक 

(ड) उत्तरदायित्व

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:

(अ) सहभागात्मक 

(ब) पारदर्शकता

(क) कायदयाचे राज्य

(ड) सहमतीदर्शक

(इ) उत्तरदायित्व

स्पष्ट करा

उत्तर

(अ) सहभागात्मक: सहभागात्मक हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कायार्साठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचा आवाज (विचार) आणि मागण्या शासनापर्यंत पोचवल्या जातील याची खात्री केली जाते. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते.

(पारदर्शकता: पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्‍य झाले आहे. २००५ पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्‍य झाले आहे.

(प्रतिसादात्मक: सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्‍नांबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते.

(ड) उत्तरदायित्व: सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हेत तर खासगी क्षेत्रांतील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोणकोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते, ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते.

(इ) कायद्याचे राज्य: संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखविण्याचे कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. न्याय्य आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्काची हमी दिली जाते.

(फ) सहमतीदर्शक: प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्‌द्यांवर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल त्याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते. शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठीची उद्‌दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो.

shaalaa.com

Notes

Students should refer to this answer according to their question and preferred marks.

सुशासनाची मूल्ये
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: समकालीन भारत : सुशासन - स्वाध्याय [पृष्ठ ५८]

APPEARS IN

बालभारती Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 5 समकालीन भारत : सुशासन
स्वाध्याय | Q ६ | पृष्ठ ५८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×