Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.
उत्तर
नमुना अवकाश,
S = {HH, HT, TH, TT}
∴ n(S) = 4
समजा, घटना A: कमीत कमी एक छापा मिळणे, ही आहे.
∴ A = {HT, TH, HH}
∴ n(A) = 3
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`
∴ P(A) = `3/4`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: एकही छापा न मिळणे.
ii) घटना B: कमीत कमी दोन छाप मिळणे.
एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.
ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे.
एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ५ च्या पटीत असणे, या घटनांची संभाव्यता काढा.
जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?
जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.
एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
खालील कृती करा.
तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) = `square`
वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) = `square`
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = `square`
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) = `square`
एका फाशाच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला, तर वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:
घटना A : छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.