Advertisements
Advertisements
प्रश्न
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा हिरवा असणे.
उत्तर
समजा, 2 लाल फुगे R1, R2,
3 निळे फुगे B1, B2, B3
आणि 4 हिरवे फुगे G1, G2, G3, G4 मानू.
∴ नमुना अवकाश
S = {R1, R2, B1, B2, B3, G1, G2, G3, G4}
∴ n(S) = 9
समजा, घटना B : प्रणालीला मिळालेला फुगा हिरवा असणे.
∴ C = {G1, G2, G3, G4}
∴ n(C) = 4
∴ P(C) = `("n"("C"))/("n"("S"))`
∴ P(C) = `4/9`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: एकही छापा न मिळणे.
ii) घटना B: कमीत कमी दोन छाप मिळणे.
एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.
ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
एक्का मिळणे.
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
गोलरक्षक हा संघनायक असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 11 च्या पटीत असणे.