Advertisements
Advertisements
प्रश्न
गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते.
- गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहन आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते.
- गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी, इतर उद्योगांचा विकास झाला आहे.
- गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरीत्या मर्यादा आल्या आहेत.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते.
shaalaa.com
मानवी वस्ती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?