Advertisements
Advertisements
प्रश्न
गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा.
लघु उत्तर
उत्तर
गोपाळची निरपेक्ष भावना मला आवडली. सहलीसाठी म्हणून गेलेल्या गोपाळने गडाच्या पायथ्याशी लागलेली आग विझवण्यास स्वत:हून पुढाकार घेतला. जिवाची पर्वा न करता झाडे-झुडुपे, गाई-गुरे, तसेच सर्व गुराख्यांचे प्राण वाचवण्यास त्याने प्राधान्य दिले. आपल्या एकट्याने आग विझेल, की नाही हे माहीत नसताना एकट्याने प्रयत्न सुरू केले. यात गोपाळचा कोणताही स्वार्थ नव्हता. त्याबदल्यात त्याला काही मिळणारही नव्हतं. तरीही जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या कार्यामुळे मला तो विशेष आवडला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?