Advertisements
Advertisements
प्रश्न
घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल?
थोडक्यात उत्तर
उत्तर
घनकचरा व्यवस्थापनामध्ये व्यक्तिगत पातळीवर सहभाग नोंदवताना खालील वेगवेगळ्या बाबी करता येतील:
- कचरा कचराकुंडीतच टाकणे.
- वस्तूंची दुरुस्ती व देखभाल करून त्यांचा अधिक काळ वापर करावा.
- घनकचरा व्यवस्थापनात 3 ‘R’ मंत्राचा वापर करणे. कचरा कमी करणे (Reduce), कचऱ्याचा पुनर्वापर (Reuse), कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण (Recycle)
- चॉकलेट, बिस्किटे, आइस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे प्लॅस्टिक आवरण रस्ता किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यात टाकणे.
- प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळणे व पर्याय म्हणून कापडी पिशवी, घरगुती जुन्या साड्या, बेडशीट, पडदे यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करणे.
- कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहिणे. ग्रीटींग कार्डस्, गिफ्ट पेपर्सचा पुन्हा वापर करणे.
- टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वत:जवळील हातरूमाल वापरणे.
- शिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापरणे.
- घनकचरा व्यवस्थापनात स्वत:, कुटुंब व समाज यांना प्रोत्साहित करणे, प्रबाेधन करणे, विविध कार्यक्रम राबवणे.
- वापरा आणि फेका (Use and Throw) अशा प्रकारच्या वस्तू, पेन, शीतपेयांच्या कॅन्स, टेट्रापॅक्स खरेदी करण्याचे टाळाणे.
shaalaa.com
घनकचरा व्यवस्थापन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?