Advertisements
Advertisements
प्रश्न
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर
या पाठात लेखकाने हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी' या कादंबरीचा परिचय करून दिला आहे. कादंबरीचे कथानक तसे साधे आहे. एका धाडसी म्हाताऱ्या कोळ्याला एके दिवशी प्रचंड ताकदीच्या देवमाशाची शिकार करायची होती. अखेरीस एक प्रचंड देवमासा या म्हाताऱ्या कोळ्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जिवाच्या शथाने देवमाशाशी लढत दिली आणि त्याच्यावर विजय मिळवला. विजयाच्या आरोळ्या ठोकत तो किनाऱ्याकडे निघाला. वाटेत त्या देवमाशावर शार्क माशांनी मोठा हल्ला केला. देवमाशाला त्यांनी खाऊन टाकले. जाळ्यामध्ये देवमाशाची फक्त हाडे शिल्लक राहिली. म्हणजे त्या कोळ्याला देवमासा मिळाला आणि मिळाला नाहीसुद्धा! यावर तो कोळी निराश झाला नाही. हतबल झाला नाही. तो हसला आणि 'उदया पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जाऊ,' असा त्याने निश्चय केला.
तो देवमासा आणि शार्क मासे महाप्रचंड शक्तिशाली नियतीचे प्रतीक होत. हा कोळी संपूर्ण मानवजातीचा प्रतीक होय. या कोळ्याची लढाई म्हणजे संपूर्ण मानवजातीचीच लढाई होय. हजारो-लाखो वर्षांपूर्वीपासून माणूस नियतीशी झगडत आहे. प्रत्येक वेळी माणूस नियतीकडून पराभूत होतो. तरीही तो पुन्हा नियतीशी झगडायला सिद्ध होतो. जिंकण्याची इच्छा, त्याची विजिगीषु वृत्ती या लढाईतून दिसून येते. हेमिंग्वे आपला हाच दृष्टिकोन या कादंबरीतून मांडला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.