Advertisements
Advertisements
प्रश्न
हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा.
लघु उत्तर
उत्तर
- हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे.
- हिमालयाचा विस्तार ताजिकिस्तानमधील पामीर पठारापासून पूर्वेकडे आहे, तर भारतामध्ये तो जम्मू-काश्मीरपासून आसामपर्यंत पसरलेला आहे.
- हिमालय पर्वत प्रणाली अनेक समांतर पर्वतरांगांपासून तयार झाली आहे. यामध्ये शिवालिक पर्वतरांग सर्वाधिक दक्षिणेकडे स्थित असून ती सर्वांत नवीन पर्वतरांग आहे.
- शिवालिक पर्वतरांगेच्या उत्तरेला लघु हिमालय, बृहद् हिमालय आणि हिमालयापलीकडील पर्वतरांगा आहेत.
- हिमालयाचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊ हिमालय) आणि पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असे मुख्य तीन भाग केले जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?