Advertisements
Advertisements
प्रश्न
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान सहा उपाय सुचवा.
उत्तर
इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात:
- किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
- वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
- ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
- प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
- या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
- या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
- या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत.
Notes
विद्यार्थी वरील उपाययोजनांमधील कोणत्याही ६ उपायांचा उपयोग करू शकतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
जनांसाठी इतिहास इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदा. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयांचा काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी. अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास'. परदेशातील अनेक विद्यापिठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. |
१. 'जनांसाठी इतिहास' म्हणजे काय?
२. भारतातील कोणत्या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे?
३. इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणते गैरसमज असतात?
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा संबंध असतो?