मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

कारणे लिहा. हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ______

एका वाक्यात उत्तर

उत्तर

हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले; कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता.

shaalaa.com
निर्णय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: निर्णय - कृती [पृष्ठ ७७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 18 निर्णय
कृती | Q (२) (अ) | पृष्ठ ७७

संबंधित प्रश्‍न

खालील आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ______


रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.

(अ) चार्जिंग सुरू करणे.
(आ)      ↓
(इ)       ↓
(ई)       ↓

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

वाळवंटातील हिरवळ - ______ 


खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

कासवगती - ______


खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

अचंबित नजर - ______


खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

द्‌विधा मन:स्थिती - ______ 


रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या (निर्णय) आधारे स्पष्ट करा.


‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.


‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृती पूर्ण करा. (2)

             न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो.’’ एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो.

(2) उत्तरे लिहा. (2)

  1. रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा.
  2. रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.

(3) स्वमत. (3)

रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×