Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे सांगा.
ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
कारण सांगा
उत्तर
- भारत जगाच्या एकूण क्षेत्रांपैकी केवळ २.४१% भूक्षेत्र व्यापतो; मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे, तर ब्राझीलने जगाच्या एकूण भूभागापैकी ५.६% इतके क्षेत्र व्यापले आहे; परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७८% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे.
- २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी आहे, तर ब्राझीलमधील २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
- याचाच अर्थ भारताची लोकसंख्येची घनता ही ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने भारतातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होणारी जमीन ही ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
म्हणजेच, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील उद्योग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?