Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________ |
उत्तर
पण एके दिवशी काम करत असताना ढवळ्या नावाचा बैलाचा पाय खड्ड्यात पडतो आणि बैल अडखळतो. पायाला इजा होते. त्यातून रक्त यायला लागते. तेव्हा शेतकरी घरी जाऊन घरातून हळद घेऊन येतो आणि त्या जखमेवर लावतो. त्यामुळे रक्त थांबते. पण बैलाच्या डोळ्यातील पाणी काही थांबत नाही. यावरून त्याला किती वेदना होत आहेत हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यालाही खूप वाईट वाटले. जवळपास औषध देणारे कोणी डॉक्टर नव्हते आणि औषधासाठी तालुक्याच्या गावास जावे लागत होते. आता यावेळी तर अंधार पडू लागला. तालुक्याला जाणे अशक्य होते. दुसऱ्या पवळ्या बैलाच्या डोळ्यातूनपण पाणी येत होते. मोठ्या जड अंतःकरणाने शेतकऱ्याने कसेतरी तेथे एक झोपडी बनविली आणि त्यात ढवळ्या बैलाला बांधून तो घरी आला आणि गोठ्यात पवळ्या बैल बांधून उद्या ढवळ्या बैलाचे काय करायचे असा विचार करून झोपी गेला.
सकाळी उठून पाहतो तर गोठ्यात बैल दिसत नाही. त्याला काही सुचत नव्हते. तो तसाच शेतात आला आणि पाहतो तर दुसरा बैल पवळ्या गोठ्यातून त्याला बांधलेली दोरी तोडून या ढवळ्या बैलाजवळ येऊन बसला होता. त्याच्याही डोळ्यात पाणी होते.
यावरून शेतकऱ्याला हे दोन बैल प्राणी असून किती जीवापाड प्रेम करतात आणि आपण माणुस असून एकमेकांच्या जीवावर उठतो. साध्या-साध्या गोष्टीमधून वैर उत्पन्न करतो आणि आपला नाश करून घेतो. हे या दोन्ही बैलांच्या प्रेमावरून दिसून आले.