मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील चौकटी पूर्ण करा. आनंदाला आकर्षित करणारा - ______ - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चौकटी पूर्ण करा.

आनंदाला आकर्षित करणारा - ______

रिकाम्या जागा भरा

उत्तर

आनंदाला आकर्षित करणारा - आनंद

shaalaa.com
आयुष्य... आनंदाचा उत्सव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव - कृती [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 1.03 आयुष्य... आनंदाचा उत्सव
कृती | Q (२). (आ). (१) | पृष्ठ १५

संबंधित प्रश्‍न

कृती करा.

लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमत


कृती करा.

लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे


कृती करा.

माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार


यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.


पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.


शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.


यशामुळे आत्मविश्वास वाढतो.


खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.


हे केव्हा घडेल ते लिहा.

माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...


हे केव्हा घडेल ते लिहा.

आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...


हे केव्हा घडेल ते लिहा.

एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...


खालील चौकटी पूर्ण करा.

शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू- ____________


खालील चौकटी पूर्ण करा.

बाहेर दाराशी घुटमळणारा- ____________


खालील चौकटी पूर्ण करा.

आनंदाला प्रसवणारा- ____________


खालील चौकटी पूर्ण करा.

आनंद अनुभवण्याची निमित्तं- ______ ______


स्वमत.

‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


स्वमत.

‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.

‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.


अभिव्यक्ती.

खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.


पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हांला हलकंहलकं, पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत.

काहींना एखादं बक्षीस मिळालं, तरी त्या ‘अमक्या’ला चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग ‘त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही’, याचाच अधिक आनंद होतो. स्वत:ला काही मिळणं, स्वत: आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली, की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे, तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो, तेव्हा त्याला सगळं जग छान, सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत, आनंदात असावं, असंच त्याच्या मनात येत असतं. स्वत:च्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा, असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते.

अनेकदा आयुष्यात असं काही घडतं, की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो, माणसं दु:खातून बाहेर येत नाहीत. त्याचं कारण ते दु:खाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील, तर आतलं दु:ख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दु:ख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल, तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्यादिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी ‘कधी पडायचा पाऊस’ म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाइलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे ... नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल, म्हणून वाट पाहत बसलं, तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं, की मग मात्र ‘नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते.

(१) 

(i) (1)

(ii) (1)

आभाळाकडे डोळे लावून बघतो तो
एकदा आनंद कसा घ्यायचा ते तंत्र जमलं कि
खरा आनंद ओळखण्याची एक

(२) खऱ्या आनंदामुळे कोणकोणत्या गोष्टी घडतात? (2)

(३) स्वमत अभिव्यक्ति (4)

‘खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो’ या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा.

किंवा

‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’ या विधानाचा तुमच्या जीवनात कसा उपयोग कराल? उदाहरणासह लिहा.


पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात; पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात.

निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वत:ला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात नाही!

आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो.

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम उद्या करू’ असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसंतरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार?

(१) सूचनेनुसारपुढील आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(i)

(ii) आनंद अनुभवण्यासाठी या गोष्टीपासून
मन मुक्त असावं लागत

(२) ‘पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत' या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (2)

(३) स्वमत अभिव्यक्ती- (४)

आनंद मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे असे लेखकास वाटले?

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

किंवा

शिवराज गोर्ले ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येक अंतरंगात असून तो मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदांचे भान जागे असावे लागते. हा विचार व्यक्त केला आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×