Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
स्पष्ट करा
उत्तर
चित्र 'अ' मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे. हे पाणी द्रव स्वरूपात आहे. चित्र 'आ' मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे. हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले. बर्फ बनू लागले म्हणजे तापमान ४° से. पेक्षा कमी होत आहे. ४° से. पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते. या तापमानाला पाणी प्रसरण पावते. हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या साहाय्याने चित्र 'आ' मध्ये दाखवले आहे. पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रूंदावलेला दिसतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?