Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
(अ) चौकट पूर्ण करा.
(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
उत्तर
(अ) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये-
१. वातानुकूलित प्रशस्त जागा
२. सोईस्कर वेळा
३. आधुनिक यंत्र सामग्री
४. अनुभवी शिक्षक
५. माफक फी
(आ) 'स्वत:सोबत एक व्यक्ती आणा, १०% सवलत मिळवा.' हा मजकूर एकत्र न लिहिता त्याची दोन तुकड्यांत वेगवेगळ्या ठिकाणी मांडणी केल्यामुळे योग्य अर्थबोध होत नाही, म्हणूनच याची मांडणी योग्यप्रकारे करणे आवश्यक आहे. जाहिरातीतील खास वैशिष्ट्यांमधील 'अनुभवी शिक्षक' ऐवजी प्रशिक्षक वापरणे योग्य ठरेल. व्यायामाचे प्रशिक्षण घेतले जात असल्याने प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक होतो. तसेच 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही ओळ योग्य ठिकाणी हवी.
(इ) संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, इ-पत्ता टाकावा, व्यायामशाळेचे महत्त्व सांगणाऱ्या लयबद्ध ओळी असाव्यात, व्यायामशाळेची मुद्रा असावी.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |
कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
♦ वाहने हळू चालवा. |
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
कृती करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.