Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अन्याय घडो कोठेही चिडून उठू आम्ही, घाव पडो कोठेही तडफडू आम्ही. हाल पाहून हळहळू होवोत कोठेही, पिळणूक पाडील पीड आम्हा असो कुणाचीही. वजन आमच्या छातीवर पायातल्या बेड्यांचे दासांच्या, वळ पाठीवर आमच्या चाबूक उठो कुठेही. अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात, दुःखितांच्या वेदनांच्या कळा उरात आमच्याही. संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरून, नाते नवीन असे काही जोडून आहोत आम्ही मानव तेही मानव आम्ही. |
- खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडून लिहा. (2)
- कवी कशाने हळहळतो?
- दुसऱ्याचे सुख पाहून
- प्रेम पाहून
- मानवता पाहून
- दुसऱ्याचे हाल पाहून
- कवीने प्रत्येक हृदयाशी कोणते नाते जोडले आहे?
- मित्रत्वाचे
- मानवतेचे
- शत्रुत्वाचे
- गुलामाचे
- कवी कशाने हळहळतो?
- खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. (3)
- कवी छातीवर कशाचा भार पेलतो?
- कवीच्या डोळ्यात कोणाचे अश्रू उभे आहेत?
- कवीच्या पाठीवर कशाचे वळ उठतात?
आकलन
उत्तर
-
- दुसऱ्याचे हाल पाहून
- मानवतेचे
- गुलामांच्या पायातील बेड्यांचा भार कवी छातीवर पेलतो.
- कवीच्या डोळ्यात साऱ्या अभाग्याचे अश्रू आहेत.
- कुणाच्याही पाठीवर चाबूक ओढला, कोठेही अन्याय झाला तर कवीच्या पाठीवर वळ उठतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?