Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | योगी सर्वकाळ सुखदाता |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ। |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा - | (i) जीवन - |
(ii) मेघ - | |
(iii) निर्मळ - | |
(iv) रसना - |
तक्ता पूर्ण करा
उत्तर
मुद्दे | योगी सर्वकाळ सुखदाता |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | कवी - संत एकनाथ |
(2) कवितेचा विषय - | योगी पुरुष जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सामान्य लोकांचा उद्धार होतो. कवीने योगी पुरुषांची तुलना पाण्याशी केली असून, त्यांच्यातील महानता अधोरेखित करताना योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात, असे स्पष्ट केले आहे. |
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | पाणी वरून मळकट दिसले तरीही, तेच पाणी योग्य उपायांनी स्वच्छ करता येते. तसेच, संत किंवा योगीजन आपल्या सत्संग आणि चांगल्या आचरणाने समाजातील अशुद्धता दूर करून लोकांना निर्मळ बनवतात. |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करून योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व प्रभावीपणे मांडले आहे. कवीने सोप्या भाषेत योगी सर्वकाळ सुखदायक कसा असतो, हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे. योगी पुरुष आत्मज्ञानाद्वारे सामान्य लोकांचा उद्धार करतात, हा विचार कवितेत ठळकपणे मांडलेला आहे. समर्पक दृष्टान्त, प्रसादगुण, माधुर्य आणि शांत रसाने भरलेली ही रचना मनाला भावते. यामुळे ही कविता मला अत्यंत प्रिय वाटते. |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा - | (i) जीवन - अस्तित्व, आयुष्य |
(ii) मेघ - ढग | |
(iii) निर्मळ - शुद्ध, निरभ्र | |
(iv) रसना - जीभ |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?