Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
'खोद आणखी थोडेसे'
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -
- कवितेचा विषय -
- कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -
लघु उत्तर
उत्तर
- कवयित्री - आसावरी काकडे
- ध्येय साध्य करताना येणाऱ्या अडचणींना न घाबरता, जिद्द, आत्मविश्वास आणि संयम ठेवत सतत प्रयत्न करत राहणे, तसेच चांगुलपणावर विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे, हा या कवितेचा मुख्य विषय आहे.
- 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री सकारात्मकता आणि प्रयत्नवाद यांचे मूल्य आपल्या मनावर बिंबवते. ती खोदण्याच्या क्रियेचे आणि झऱ्याचे समर्पक उदाहरण देऊन हा संदेश प्रभावीपणे व्यक्त करते. अर्थपूर्ण आशय कमीत कमी शब्दांत मांडण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात लिहिलेली असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या आणि चौथ्या ओळींमध्ये यमक गुंफलेले आहे, ज्यामुळे ती लयबद्ध होते आणि गाता येते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही कविता मला खूप आवडते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?