मराठी

खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. सायंकाळी समुद्रकिनाऱ्यातील एक दिवस निसर्ग दृश्य अविस्मरणीय दिवस आनंददायी वातावरण -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

सायंकाळी समुद्रकिनाऱ्यातील एक दिवस

सुट्टीचे दिवस होते. म्हणून आम्ही सर्व जण पाच-सहा दिवस गोव्याला गेल होतो. ट्रॅव्हल बसने गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहून सायंकाळी कलंगुट बीचवर आलो. इकडे-तिकडे पाहतो तर समुद्राच्या वाळूमध्ये बरीच मुले खेळत होती. कोणी किल्ले तयार  करत होते, कोणी वाळू फेकत होते तर कोणी शिंपले शोभत होते. असा त्यांचा उद्योग सुरू होता. इतर मोठी माणसे कोणी समुद्रात पोहत होते तर कोणी समुद्राच्या लाटाबरोबर खेळत होते. कोणी वाळूत बसून भेळपुरी-पाणीपुरी असे पदार्थ खात होते. मी मात्र त्या अथांग पसरलेल्या समुद्राच्या पाण्याकडे पाहत बसलो होतो. असंख्य विचार त्यावेळी माझ्या मनात येऊन त्या लाटेसारखे जात होते.

या समुद्रकिनाऱ्याचा कोणालाही कंटाळा येत असेल असे वाटत नव्हते. कारण रोज तीच वाळू, त्याच लाटा, तेच पाणी. असे असले तरी या सर्वांकडे पाहत बसले तर वेळ कसा जातो हे कळत नव्हते. कंटाळा वाटत नाही. बघता-बघता समुद्रकिनाऱ्यावरील माणसांची गर्दी वाढू लागली. मला वाटते की अचानक कशी गर्दी वाढली. तेव्हा पाहतो तर सर्वांची नजर पश्चिमेकडील त्या लालबुंद झालेल्या सूर्याकडे होती. मलाही हे दृश्य पाहन खूपच आनंद झाला. सूर्याकडे एरव्ही पाहणे अशक्य असते. पण आता आपण त्याकडे व्यवस्थित पाहू शकतो. हळूहळू तो लाल गोळा पाण्यात बुडत होता. सर्व जण आनंदाने आणि कुतूहलाने हे दृश्य पाहत होते. मलाही खूप समाधान वाटले.

हळूहळू लोकांची गर्दी कमी होत होती. मुलेही वाळूच्या मैदानातून परतत होती. माझ्या विचारांना एक वेगळेपणा मिळाला. आजची समुद्रकिनाऱ्यावरची संध्याकाळ आठवणीतील प्रसंग दाखवून गेली. एरव्ही इतर ठिकाणची संध्याकाळ आणि ही संध्याकाळ यात खूप फरक वाटत होता. कितीही वेळ या किनारी बसलो तरी कंटाळा येणार नाही. असा हा अविस्मरणीय प्रसंग माझ्या जीवनात या समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळने नोंदविला आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×