Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
अक्षरधारा वाचनालय चिपळूण शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा |
यश इरा गुप्ते वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.
उत्तर
दिनांक - १५ फेब्रुवारी २०२५
प्रति,
ग्रंथपाल,
अक्षरधारा वाचनालय,
चिपळूण.
विषय: वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती
आदरणीय महोदय,
मी, यश इरा गुप्ते, सरस्वती स्कूल, भायंदर शाळेची विद्यार्थिनी, आपण आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थी भव्य वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होऊ इच्छिते. स्पर्धा दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 वाजता अक्षरधारा सभागृह, चिपळूण येथे होणार असल्याचे समजले.
कृपया मला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी द्यावी. तसेच, आवश्यक त्या सूचना व नियम कळवावेत.
आपल्या सकारात्मक उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
माझी संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे:
नाव: यश/इरा गुप्ते
शाळेचे नाव: सरस्वती स्कूल, भायंदर
संपर्क क्रमांक: 9546267782
ई-मेल: [email protected]
कृपया माझ्या सहभागाची नोंद घेऊन त्याबाबत मला लवकरात लवकर माहिती द्यावी.
धन्यवाद!
आपली कृपाभिलाषी,
इरा गुप्ते
सरस्वती स्कूल,
भायंदर - ४०००१८