Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
थोडक्यात उत्तर
उत्तर
सातारा : ता. २४ जुलै (वार्ताहर) सध्या आपल्या परिसरामध्ये पावसाची अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणक्षेत्रात अति पाऊस पडत आहे. पाण्याच्या साठ्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिला तर पाणी धोक्याची पातळी ओलांडेल. म्हणून सध्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तेव्हा दक्षतेचा उपाय म्हणून नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तरी लोकांनी जास्त पाण्यामध्ये जाऊ नये आणि सावधानी बाळगावी.
shaalaa.com
बातमी लेखन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?