मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा: अ, आ, इ, ई ...मराठी सुलेखन वर्गसमीक्षा अकॅडेमि तर्फेमराठी सुलेखन वर्गाचे आयोजन कालावधी1 मे ते 15 मे वेळ -सकाळी १ ते 10 वैशिष्ट्ये माफक फी - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा:

अ, आ, इ, ई ...
मराठी सुलेखन वर्ग
समीक्षा अकॅडमी तर्फे
मराठी सुलेखन वर्गाचे आयोजन
कालावधी
1 मे ते 15 मे
वेळ -
सकाळी 9 ते 10

वैशिष्ट्ये

  • माफक फी
  • वैयक्तिक मार्गदर्शन
संपर्क - व्ही. एम. गायकवाड (आयोजक)
920, रविवार पेठ, सातारा
E-mail - [email protected]

मधुरा/मधुकर जगताप विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुलेखन वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

लेखन कौशल्य

उत्तर

दिनांक: 4 फेब्रुवारी 2025

प्रति,
श्री. व्ही. एम. गायकवाड
आयोजक, मराठी सुलेखन वर्ग
920, रविवार पेठ, सातारा

विषय: शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मराठी सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याची विनंती

माननीय महोदय,

मी आपल्या समीक्षा अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी सुलेखन वर्गा विषयी माहिती मिळवली. आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या या वर्गात सहभागी होण्याची उत्सुकता आहे.

आपल्या वर्गाचे वैशिष्ट्ये जसे की माफक फी व वैयक्तिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यामुळे आमच्या शाळेतील इच्छुक विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश मिळावा, अशी नम्र विनंती आहे.

कृपया प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहिती कळवावी. आपण आमच्या विद्यार्थ्यांना संधी दिल्यास आम्ही आपले आभारी राहू.

धन्यवाद!

आपला विश्वासू,
मधुकर जगताप
विद्यार्थी प्रतिनिधी
सरस्वती विद्यामंदिर, आचोळे

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×