मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील ओळींचा अर्थ लिहा. समुद्र अस्वस्थ होऊन जातोशहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींचा अर्थ लिहा.

समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.

लघु उत्तर

उत्तर

ओळींचा अर्थ: माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून विमनस्कपणे हिंडतो, वस्त्यांमधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. हातांवर डोके ठेवून हतबल होऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय ह्रास पाहत राहतो.

shaalaa.com
समुद्र कोंडून पडलाय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.09: समुद्र कोंडून पडलाय - कृती (३) [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 2.09 समुद्र कोंडून पडलाय
कृती (३) | Q 1 | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

कारणे लिहा.

कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण...


कारणे लिहा.

समुद्र अस्वस्थ होतो, कारण...


कारणे लिहा.

समुद्र शिणून जातो, कारण...


तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना मनाला भिडणारे शब्दसमूह
     

चौकटी पूर्ण करा.


काव्यसौंदर्य.

‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


काव्यसौंदर्य.

'समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.'
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.


अभिव्यक्ती.

‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.


अभिव्यक्ती.

शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.


समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत.

वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.


खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या
      बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोके.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या
     माणसांचे पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्‍त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या
     रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या
      पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

(१) कारणे लिहा.

(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण ______

(र) समुद्र शिणून जातो, कारण ______

(२) चौकटी पूर्ण करा.

(३) अभिव्यक्ती:

शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×