Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’
उत्तर
आशयसौंदर्य : संतकवी संत रामदास यांनी श्रीदासबोधातील 'उत्तमलक्षण' या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.
काव्यसौंदर्य : संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना समाजात वावरणाऱ्या व्यक्तीने ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. संत रामदास म्हणतात की, आदर्श व्यक्तीने लोकांची मने मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा तसेच सत्याचा मार्ग स्वीकारावा. वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. विवेकाने वागावे.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. 'तोडू नये, जोडू नये, सोडू नये' अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
तोंडाळ
खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
संत
खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी | दक्षता |
(१) आळस | ______ |
(२) परपीडा | ______ |
(३) सत्यमार्ग | ______ |
‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोष्टक पूर्ण करा. (२)
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. (२)
क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
i. | आळस | ______ | मानू नये. |
ii. | परपीडा | ______ | वागू नये. |
iii. | सत्यमार्ग | ______ | नये. |
iv. | सभेतील वर्तन | ______ | नये. |
३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।
४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।