Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.
खडबडीत पृष्ठभाग
लघु उत्तर
उत्तर
पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक हे छोटे झुडूप आहे. १० मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लालचुटुक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खडबडीत व खरखरीत दिसतात, परंतु यांत खूप औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांत प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. प्राजक्ताची फुले दिसायला सुंदर असतात, परंतु सूर्य उगवल्यावर ती लवकरच सुकून जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.2: वनस्पती : रचना व कार्ये - स्वाध्याय [पृष्ठ १२८]