Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.
पाखरे आणि पहाट यांचं नातं लेखकाने कसे सांगितले आहे?
लघु उत्तर
उत्तर
लेखक यू. म. पठाण यांच्या 'रेशीमबंध' या ललित लेखात पाखरे आणि पहाट यांच्यातील जवळच्या नात्याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. पहाटे सर्वात आधी जाग येते ती पाखरांना. पाखरे किलकिल्या डोळ्यांनी जगाकडे पाहतात आणि हळूच एकमेकांशी कुजबुजतात. ती पहाटेच्या किरणांना खुणावतात, जणू पहाट येण्यासाठी त्यांची परवानगीच मागते. पाखरे पंख फडफडवल्याशिवाय पहाट येतच नाही, असे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते लेखकाने रेखाटले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?