Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
तीन नाणी एकाच वेळी फेकली असता,
घटना A साठी अट, कमीत कमी दोन छाप मिळणे अशी आहे.
घटना B साठी अट, एकही छाप न मिळणे अशी आहे.
घटना C साठी अट, दुसऱ्या छाप मिळणे अशी आहे.
उत्तर
नमुना अवकाश,
S = {HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH, TTT}
∴ n(S) = 8
घटना A साठी अट, कमीत कमी दोन छाप मिळणे ही आहे.
∴ A = {HHT, HTH, THH, HHH}
∴ n(A) = 4
घटना B साठी अट, एकही छाप न मिळणे ही आहे.
∴ B = {TTT}
∴ n(B) = 1
घटना C साठी अट, दुसऱ्या छाप मिळणे ही आहे.
∴ C = {HHH, HHT, THH, THT}
∴ n(C) = 4
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील प्रयोगासाठी घटना संच स्वरूपात लिहा.
एका फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे.
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
एक फासा टाकला असता,
घटना A साठी अट, वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळणे अशी आहे.
घटना B साठी अट, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे.
घटना C साठी अट, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे.
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता,
घटना A साठी अट, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6 च्या पटीत असणे अशी आहे.
घटना B साठी अट, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे.
घटना C साठी अट, दोन्ही फाशांवरील अंक समान असणे अशी आहे.
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत.
घटना A साठी अट, तयार झालेली संख्या सम संख्या मिळणे अशी आहे.
घटना B साठी अट, तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे अशी आहे.
घटना C साठी अट, तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे.
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची 'पर्यावरण समिती' बनवायची आहे.
घटना A साठी अट, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे.
घटना B साठी अट, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे.
घटना C साठी अट, समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे.
खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ त्यातील नमुना घटकांची संख्या n(S), तसेच घटना A, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A), n(B) आणि n(C) लिहा.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले.
घटना A साठी अट, छाप आणि विषम संख्या मिळणे अशी आहे.
घटना B साठी अट, H किंवा T आणि सम संख्या मिळणे अशी आहे.
घटना C साठी अट, फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे.