Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा
ग्राहक संरक्षण
स्पष्ट करा
उत्तर
इंग्रजी भाषेतील Consumer या शब्दाची उत्पत्ती लॅटीन भाषेतील Consumere या शब्दापासून झाली असून त्याचा अर्थ 'खाणे किंवा पिणे' असा होतो. ग्राहक म्हणजे नैसर्गिक किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणारी व्यक्ती होय. सामान्यपणे ग्राहकांचे अधिकार आणि हित यांचे संरक्षण करणे म्हणजेच ग्राहक संरक्षण होय. यात ग्राहकांचे अधिकार आणि हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व उपायांचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकास 'बाजारपेठेचा राजा' म्हणून संबोधले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?