Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
कर्जाऊ भांडवल
टीपा लिहा
उत्तर
- कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यांसाठी मालकीचेभांडवल पुरेसेनसते. मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. खाजगी कंपनीला नोंदणी (incorporation) झाल्यानंतर लगेच कर्जघेण्याचा अधिकार प्राप्त होतो, पण सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र घेतल्यानंतर कर्जघेण्याचेअधिकार प्राप्त होतात.
- अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीचेकर्जआवश्यकतेनुसार घेतले जाते जेव्हा कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल आणि त्यासाठी अतिरिक्त भांडवल आवश्यक असेल अशा कंपनीस व्यवसायाच्या नंतरच्या टप्यावर कर्जाऊ भांडवल उभे करणे जास्त हितावह असते. कर्जाऊ भांडवलावर व्याज दिले जाते. हेव्याज निश्चित दराने दिले जाते. कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते.
shaalaa.com
कर्जाऊ भांडवलाचे स्रोत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?