Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
मी काशीत असताना गंगेच्या काठावर जाऊन गात बसायचो. रात्रीच्या एकांत वेळी मी गात असे. किती सुंदर व प्रसन्न तो प्रवाह! तिचा तो भव्य गंभीर प्रवाह व तिच्या पोटात साठविलेले ते आकाशातील अनंत तारे. मी मुका होऊन जात असे. शंकराच्या जटाजटातून म्हणजेच या हिमालयातून वाहत येणारी ती गंगा. तिच्या तीरावर राज्ये तृणवत समजून फेकून देऊन राजे तपश्चर्येसाठी येऊन बसत. अशी ती गंगा पाहून मला शांत-शांत वाटे. त्या शांतीचे वर्णन कसे करू? बोलण्याची तेथे सीमा होई. मेल्यावर आपल्या अस्थी गंगेत पडाव्या असे हिंदू मनास का वाटते ते समजून येई. तुम्ही हसा. तुम्ही हसलात म्हणुन काही बिघडत नाही. परंतु मला या भावना फार व संग्रह करण्यासारख्या वाटतात. मरताना दोन थेंब गंगेचे तोंडात घालतात. ते थेंब म्हणजे परमेश्वर मुखात अवतीर्ण होतो. ती गंगा म्हणजे परमात्मा. परमेश्वराची ती करुणा वाढून राहिली आहे. गंगेच्या ठिकाणी परमेश्वर न दिसेल तर तो कोठे दिसणार? सूर्य, नद्या, तो धो-धो आवाज करणारा व उचंवणारा विशाल सागर या परमेश्वराच्या मूर्तीच आहेत. |
टीपा लिहा
उत्तर
मी काशीत असताना रात्रीच्या वेळी गंगेच्या काठावर गात असे. गंगेचा प्रवाह शंकराच्या जटेतून म्हणजे हिमालयातून वाहतात. सुंदर प्रसन्न व धीरगंधीर! आणि तिने पोटात साठविलेले आकाशातील तारे पण किती शांत होते. अशी ही गंगा पाहून मला शांत वाटे. मृत्यूनंतर आपल्या अस्थी गंगेत का टाकतात आणि गंगातीर्थ तोंडात का घालतात याचे महत्त्व म्हणजे परमेश्वरच मुखात-अवतीर्ण होतो. या गंगा काठी साक्षात परमेश्वर भेटतो आणि परमेश्वर म्हणजे सूर्य, नद्या आणि धो-धो आवाज करणारा सागर होय.
shaalaa.com
सारांश लेखन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?