मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:

मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते.

पर्याय

  • सहमत

  • असहमत

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.

स्पष्टीकरण:

मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्‍यातील महत्‍त्‍वाचे स्‍पष्‍टीकरण खाली दिलेले आहे.

  1. वस्‍तूचे स्‍वरूप: वस्‍तूंच्या स्‍वरूपानुसार जीवनावश्यक वस्‍तू, सुखसोईच्या वस्‍तू आणि चैनीच्या वस्‍तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्‍तू, उदा., अन्नधान्य, औषधे, पुस्‍तके इत्‍यादींची मागणी अलवचीक असते. सुखसोई आणि चैनीच्या वस्‍तू उदा., कार, अत्‍तर (सुगंधी द्रव्ये), फर्निचर इत्‍यादींची मागणी लवचीक असते.
  2. पर्यायी वस्‍तूंची उपलब्‍धता: जेव्हा वस्‍तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्‍ध असतात अशा वस्‍तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचीक असते. उदा., लिंबू सरबत, उसाचा रस इत्‍यादी. पण वस्‍तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्‍ध नसेल. उदा., मीठ; तर अशा वस्‍तूंची मागणी अलवचीक असते.
  3. वस्‍तूचे अनेक उपयोग: एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्‍तूची लवचिकता कमी लवचीक असते. विविधोपयोगी वस्‍तूंची मागणी जास्‍त लवचीक असते. उदा., कोळसा, वीज इत्‍यादी.
  4. व्यसनाच्या वस्‍तू: सवयीच्या वस्‍तूंची मागणी अलवचीक असते. उदा., व्यसन, अमली पदार्थ इत्‍यादी.
  5. टिकाऊपणा: टिकाऊ वस्‍तूची मागणी जास्‍त लवचीक असते. उदा., फर्निचर, धुलाईयंत्र इत्‍यादी. तर नाशवंत वस्‍तूंची मागणी अलवचीक असते. उदा., दूध, भाजीपाला इत्‍यादी.
  6. पूरक वस्‍तू: एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्‍तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्‍तूंची मागणी अलवचीक असते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×