Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.
उत्तर
माझ्या शाळेचे नाव राजीव गांधी विद्यालय. पाचव्या वर्गात मी या शाळेत प्रवेश घेतला. त्या अगोदर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिकत होती. आता मी विद्यालयात जाणार हा आनंद तसेच आदरयुक्त भीती माझ्या मनात होती.
दीड-दोन महिन्यांचा विरंगुळा झाला की शाळेत जाण्याची हौस प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट मी आतुरतेने पाहत असते. पावसाची चाहूल लागल्यामुळे मी माझा रेनकोट दप्तरात ठेवला. शाळेतली मितरमत्रिणींना भेटण्यासाठी मी उत्सुक झाले होते.
सकाळ झाली मी लवकर उठून आंघोळ केली. छान पैकी नीटपणे अगदी नवा कोरा शाळेचा गणवेश घालून शाळेसाठी तयार झालो. माझ्या आईने पण लवकर उठुन माझ्यासाठी डबा तयार केला आणि मग मी आई आणि बाबा जेथे शाळेची बस येते त्या जागी जाऊन उभे झालो. या सोबतच मनामध्ये भीती आणि धडधड पण होती. पण मी ती माझी अवस्था कोणालाही दिसू दिली नाही.
नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन शिक्षक माझ्यासाठी सर्वच काही नवीन होतं. कुठेतरी मनात थोडी आदरयुक्त भिती होती. पण आनंदसुद्धा मनात मावेनासा झाला. कारण त्या शाळेत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते. दररोज प्रत्येक विषय तासिका प्रमाणे शिकवले जातात हे एकूण माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तसेच चित्रकला, खेळ ह्या तासिका सुद्धा होतात. हे ऐकून मी आनंदाने भारावून गेली आणि कधी एकदा शाळेत जाते असे मला वाटत होते.
माझे वर्गशिक्षक हे अतिशय हुशार, शिस्तप्रिय होते ते आम्हाला मराठी हा विषय शिकवत होते. त्यांची तासिका सुरू झाल्यानंतर वेळ कसा जात होता हे कळतच नव्हते. तसेच प्रत्येक विषयाचे शिक्षक अतिशय चांगले होते ते आम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवायचे. एवढ्या शिक्षकांची व तासिकांची सवय नव्हती परंतु काही दिवसातच हे सर्व हवहवसं वाटत होतं.
नवीन शाळेत प्रवेश घेतल्यामुळे सर्व मित्र मैत्रिणी हे नवीन होते. पहिल्या दिवशी फार कुणी बोललं नाही, त्यामुळे थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. परंतु दुसऱ्या दिवसापासून ते माझ्याशी हळू हळू बोलायला लागले. ते मला त्यांच्या शाळेतील अनुभव सांगू लागले. मी त्यांना माझ्या शाळेतील अनुभव सांगू लागली. आता वर्गातील प्रत्येक विद्यार्थी माझे जवळचे मित्र/मैत्रीण झाले.
आपण पहिल्या दिवशी शाळेत जातो तेव्हा बाबा आपल्याला नवीन कपडे, पुस्तके, वह्या आणून देतात. तेव्हा आपण त्या पुस्तकांचा सुगंध घेतो. तो सुगंध हा अवर्णनीय असतो.
काही शाळेच्या इमारती खूप मोठ्या असतात काही शाळेच्या इमारती ह्या छोट्या असतात किंवा काही शाळा या कुडाच्या सुद्धा असतात. परंतु शाळेचा उद्देश एकच असतो. विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे. माझ्या शाळेची इमारत ही एक मजली होती, परंतु सुंदर होती. सर्व सुविधा होत्या. शुद्ध पाणी, बाथरूम, मोठे क्रीडांगण होते. शाळेच्या अवतीभोवती भरपूर झाडे होती. या सर्व कारणांमुळे मला माझी शाळा खूप आवडते.
शाळेत फक्त अभ्यासु ज्ञानच मिळत नाही, तर शाळेतील अनेक गमती-जमती, मित्र मैत्रीतील मजा-मस्ती अशा अनेक शाळेच्या आठवणी असतात. आपण कितीही मोठे झालो तरीही शाळेच्या आठवणी नेहमी आपल्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात. नेहमी आपल्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात.