Advertisements
Advertisements
प्रश्न
खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा.
उत्तर
(१) खाणकाम हा मानवाचा एक खूप प्राचीन प्राथमिक व्यवसाय आहे.
(२) हा एकमेव प्राथमिक व्यवसाय आहे, जो अक्षवृत्ते अथवा हवामान या घटकाशी निगडित नाही.
(३) म्हणजेच खाणकाम व्यवसायावर अक्षवृत्तीय स्थानाचा आणि हवामानाचा प्रभाव पडत नाही.
(४) खाणकाम विविध खनिजांसाठी केले जाते.
(५) या खनिजांमुळे विविध उद्योगांना कच्चामाल मिळतो आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास होतो.
(६) खाणकामावर प्रामुख्याने भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती अशा घटकांचा प्रभाव पडतो.
(७) महासागरीय क्षेत्रातही खाणकाम व्यवसाय केला जातो आणि तेथून खनिज तेल, नैसर्गिक वायू या गोष्टी मिळवल्या जातात.
(८) ज्या देशांमध्ये खाणकामाचा व्यवसाय जास्त प्रमाणात विकसित झाला आहे, असेच देश पुढे आर्थिक व्यवसायातही अग्रेसर असल्याचे दिसते. उदा., उत्तर अमेरिका, युरोप खंड, रशिया.