Advertisements
Advertisements
प्रश्न
खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येतो?
सविस्तर उत्तर
उत्तर
- अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते, तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते. पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट सावली पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते.
- त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ सावली पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो; तर काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते.
- याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता, त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?