Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण ते लिहा.
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______
उत्तर
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा. (२)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
(बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. |
२) एका शब्दात माहिती लिहा. (१)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस-
- स्टेशन व रेल्वेगाडी-
ii) कारण लिहा. (१)
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...
३) स्वमत- (३)
तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूर्ण करा. (२)
अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर |
↓ |
____________ |
बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. |
२) जोड्या जुळवा. (२)
'अ' गट | 'ब' गट |
१. बरेलीचे हॉस्पिटल | अ. एम्स हॉस्पिटल |
२. जीवनमरणाची | आ. अंतरंग घायाळ करणारे |
३. दिल्ली | इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त |
४. मानसिक जखमा | ई. सीमारेषा |
३) स्वमत- (३)
’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका शब्दात उत्तरे लिहा. (२)
- अरुणिमाचा निर्धार -
- अरुणिमाचा पहिला टप्पा -
माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 'शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.' अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला 'शक्य आहे' असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स' मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब – आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ’अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!“ |
२)
1. कोण ते लिहा. (१)
एव्हरेस्ट सर करणारी महिला -
2. खालील कृतीतून व्यक्त होणारा गुण लिहा. (१)
माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.
३) स्वमत- (३)
’आपल्या आतलं एव्हरेस्ट आपल्यालाच सर करायचे असते“ हे विधान सोदाहरण तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) वर्णन करा. (२)
डेथ झोन
'डेथ झोन' ची चढाई सुरू झाली... जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला... पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. 'तुला मरायचं नाहीये, अरुणिमा', अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. 'अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर... एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरलापाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला... मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला... अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. |
२) अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अनुभव लिहा. (२)
अ) __________________
आ) __________________
इ) __________________
ई) __________________
३) स्वमत- (३)
'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. नावे लिहा. (2)
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
- अरुणिमाचे गाव - ______
दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. |
2. कारणे लिहा. (2)
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______
3. स्वमत (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा. (2)
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
- अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमत. (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.