Advertisements
Advertisements
प्रश्न
‘कृषी पर्यटन’ या विषयावर वर्गात चर्चा करून तुमच्या गावाशेजारी असणाऱ्या कृषी पर्यटन स्थळाविषयी प्रकल्प लिहा. तो वर्गात गटामध्ये सादर करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- कृषी पर्यटनामध्ये,ऊती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती, यांची मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते.
- त्याचपैकी काही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येते.
- पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास ‘कृषी पर्यटन केंद्र’ हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे.
- कृषी पर्यटन केंद्रामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:
- आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व इतर काही प्रादेशिक फळझाडे
- सावली देणारे व नयनरम्य देशी-विदेशी वृक
- शोभेची झाडे व फुलझाडे
- फुलपाखरांची बाग
- औषधी वनस्पतींची बाग
- रासायनिक खते/कीडनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या (सेंद्रिय) भाज्या,फळे.
- अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात.
- या ठिकाणी रोपे, भाज्या, फळे यांची विक्री अधिक फायदा देऊ शकते.
shaalaa.com
कृषी पर्यटन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?