मराठी

कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल.

कथा एककेंद्री असते.
अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते म्हणूनच ती लहान असते, लघू असते. ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट (छोटे) असते.

कथा भूतकाळात लिहिली जाते.
सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदा., एक होते गाव. तिथे एक दानशूर माणूस राहायचा; ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते.

कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो.
कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजाराणी असो वा एखादा टॅक्सीड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक; त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे.

श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते.
सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालकमेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही; पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळाशाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील.

(१) (२)

  1. फ्लॅशबॅक लेखनशैली म्हणजे
  2. कथा लहान असणे कारण
    कथा वाचकांची उत्कंठा वाढवणे

(२) ‘कथा मानवी जीवनाचा वेध घेते’ या विधानाचा समजलेला अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (२)

थोडक्यात उत्तर

उत्तर

(१)

  1. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे.
  2. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असते.

(२) कथा ही जीवनस्पर्शी असते. राजाराणी, टॅक्सीड्रायव्हर, नर्स, लोकसेवक असो त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याचे सामर्थ्य कथेत असते. कथा या साहित्यप्रकाशाला कोणताच जीवनाविषय वर्ज्य नसतो मानवी जीवनाचा विचार करना त्याच्या बालपणापासूनच कथेने मानवी जीवनात प्रवेश केलेला असतो. अशाप्रकारे कथा ही मानवी जीवनाचा थेट वेध घेताना दिसते.

shaalaa.com
कथा- साहित्यप्रकार-परिचय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×