Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर
खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.
वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा.
लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______
कारणे शोधा.
लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
केसभर विषयांतर
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
केसांत पांढरं पडण्याची लागण
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड
परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.