Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्या वितरण असमान असते.
टीपा लिहा
उत्तर
जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते.
shaalaa.com
लोकसंख्या वितरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?