मराठी

‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा. ‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.

थोडक्यात उत्तर

उत्तर

लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!

शाळेत एखादे शिक्षक गैरहजर म्हणजे त्यांच्याऐवजी कोणीतरी दुसरे शिक्षक वर्गावर येतात. यात संस्कृतचे गुरुजी मला फार आवडतात. अशा वेळी ते आम्हांला नवीन श्लोक व सुभाषिते शिकवतात. आज त्यांनी आम्हांला दोन सुभाषिते शिकविली. एका सुभाषितात असे म्हटले होते- दरिद्री माणसाच्या मनात अनेक इच्छा जन्म पावतात अन् नाहीशा होतात आणि दुसऱ्याचा अर्थ असा होता, की पुरुषाचे भाग्य केव्हा उदयाला येईल ते सांगता येत नाही. या सुभाषितांतील सुंदर विचार मनात फिरत असतानाच मी घराकडे चाललो होतो. रस्त्याच्या कोपऱ्यावर एका मोठया फलकावर सरकारी लॉटरीची जाहिरात मला दिसली. त्यावर लिहिलेले होते:

‘तिकिट एक रुपयाचं, बक्षीस मात्र लाखाचं’

ही पाटी पाहताच क्षणी माझ्याही मनात एक विचार चमकला आपणही एक रुपया खर्चून लॉटरीचे तिकीट घ्यावे नि पाहावी नशिबाची परीक्षा! कुणी सांगावे, पुरुषाचे भाग्य केव्हा उजळते ते! मी पटकन विक्रेत्याकडे गेलो. एक तिकीट विकत घेतली अन्‌ घरी आलो. सारा दिवस बक्षिसाचाच विचार. कुणी सांगावे योगायोगाने मलाच पहिले बक्षीस मिळाले तर!

कोणत्याही गोष्टीला योजनापूर्वक आखणी हवी. योजना आखण्याचीच ही वेळ आहे. मग त्याला लॉटरीचा अपवाद कशाला म्हणावे? बक्षीस मिळाल्यानंतर ते पैसे कसे वापरावे याचा मी एक आराखडा तयार केला.

समजा, मला दैवयोगाने पहिले बक्षीस म्हणजेच एक लाख रुपये मिळाले तर- प्रथम मी बाजारात जाईन अन् दोन किलो पेढे आणीन. त्यांतले पाच देवापुढे ठेवून असेच सुखाचे दिवस दाखविण्यासाठी देवाची करुणा करीन. माझ्या सर्व मित्रांना पढे देऊन ही गोड बातमी सांगेन.

माझी ही काही योजने आहेत. वैयक्तिक स्वार्थ साधून आप्तेष्ट, समाज अन्‌ देश यांची ऋणे फेडण्याची संधी मिळाली तर तिचा फायदा मी अवश्य घेईन. माझ्या आईच्या अंगावरील फाटके लुगडे पाहून मला सारखे वाटायचे- मला नोकरी लागली, की पहिल्या पगारातून तिला एक चांगले लुगडे विकत घेईन, आता तर काय? चांगली लॉटरी लागलेली आहे! कृतज्ञतेची पहिली भेट म्हणून आईला चांगली लुगडे देईन, तसेच वडिलांचे कपडे बदलता आले तर केवढे समाधान वाटेल! त्यांचासाठी कोट, शर्ट, टीपी-साफा पोशाख आणून त्यांना आश्चर्याचा एक सुखद धक्का देईन. आईवडिलांप्रमाणे माझ्या भावंडांची दैन्यावस्था दूर करण्यासाठी कपडे, पुस्तके, वह्या आणि आवश्यक त्या वस्तू त्यांना आणून देईन.

मला स्वत:साठी चांगले कपडे, उत्कृष्ट फर्निंचर, आवडत्या ग्रंथानी भरलेले छोटेसे ग्रंथालय, स्कूटर इत्यादि ज्या ज्या वस्तू हव्याहव्याशा वाटायच्या त्या सर्व या पैशातून मी विकत घेईन.

इतक्या चांगल्या मी वस्तुं नी सुखासमाधानाने राहायचे म्हणजे आजचे छोटे नी अपुरे घर बदलायलाच हवे; या नव्या वैभवाला साजेसा एक मालकीचा टुमदार फ्लॅट घेऊन टाकीन.

अशा तऱ्हेने निम्म्यपेक्षा अधिक पैसे खर्च झाल्यावर जगता यावे म्हणून काही रक्कम कायमची ठेव म्हणून सरकारी कर्जरोख्यांत वा अल्पबचत योजनेत गुंतवीन. यावर येणारे व्याज दरमहा घरखर्चासाठी वडिलांच्याकडे देईन. राष्ट्राचा पैसा राष्ट्राच्या कल्याणसाठी गुंतवणे हे मी माझे कर्तव्यच समजेन. माझ्या गरिबीच्या परिस्थितीत माझ्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी मला साहाय्य केले त्या व्यक्ती व संस्था यांच्यासाठी मला काही करता आल्यास मी करेन. त्याशिवाय अनाथ मुलांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संस्थाना काही देणगी देईन. समाजऋण फेडणे हे मी माझे कर्तव्यच मानेन.

हे सर्व आखल्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करीन. पण केव्हा? मला लॉटरीत एक लाख रुपये मिळाले तर! माझे भाग्य केव्हा उजळेल हे कोण सांगेल? मात्र याच वेळी गुरुजींनी सांगितलेले पहिले सुभाषितही आठवले: ‘उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा :!’ (दरिद्री माणसांच्या इच्छा जश्या त्यांच्या मनात उगवतात तशाच त्या मावळतात.) त्यामुळे स्वैर मनाला मला त्याच वेळीच लगाम घालता आला.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×