मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

निसर्गात प्राणी-वनस्पती सहकार्याने राहतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस म्हटले जाणारे वाघ-सिंहसुद्धा आपले एका वेळेचे पोट भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशालासुद्धा हात लावत नाहीत. कधी एकदा आपण भुकेलेल्या लोकांच्या पोटात जातो, त्यांची भूक भागवतो, असे पिके, फळे यांना वाटत असते. माणूस मात्र याविरुद्ध वागताना दिसतो.
माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते. स्वार्थी पणामुळे तो खोटेनाटे व्यवहार करतो. आपल्याच लोकांशी लबाडीने वागतो. सरळपणान व्यवहार करण्याऐवजी फसवणूक करण्याचा विचार करतो. या प्रवृत्तीमुळे जगभर भांडणतंटे, मारामाऱ्या, युद्ध होत आहेत. जगातला सगळा चांगुलपणा नष्ट झाला आहे. माणसे दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. लोक आनंद उपभोगण्याऐवजी यातना भोगत आहेत.
लोकांनी चांगलेपणाने जगावे, तर सर्व मानवी समाज सुखी-आनंदी होईल. साधी गाईगुरे खाल्लेल्या चाऱ्याबद्दल दूध देतात. माणसाचा वाईटपणा पाहून बोरी-बाभळींच्या अंगावर काटे येतात. तरीही त्या माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती कुंपणासारख्या उभ्या राहतात. माणसाकडे मात्र अशी कृतज्ञता नाही. खरेतर, पोट कितीही भरले, रोज रोज भरले, तरी ते रिकामे होतेच. ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिवसरात्र धडपडतो, तो देहसुद्धा एक दिवस नष्ट होतो. मग उरते काय? हृदयांचे देणेघेणे. शुद्ध निःस्वार्थी प्रेमाखेरीज दुसरे चांगले, उदात्त असे या जगात काही नाही. यातच माणूसपणा आहे. पण माणूस ते विसरून गेला आहे. म्हणून बहिणाबाई माणसाला आर्तपणे विनवणी करत आहेत, "हे माणसा, तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे. पण तू खऱ्या अर्थाने माणूस कधी होणार?"

shaalaa.com
परिमळ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 1.05 परिमळ
कृती | Q (३) (इ) | पृष्ठ २४

संबंधित प्रश्‍न

कृती करा.


कृती करा.

बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष


कृती करा.

अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे


तुलना करा.

मुद्दे माणूस प्राणी
वर्तणूक    
इमानिपणा    

खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.

घटना परिणाम
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. ______
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. ______
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. ______

खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -


खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -


'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×