Advertisements
Advertisements
प्रश्न
'मी फुलपाखरू झालो/झाले तर....' या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर
मी फुलपाखरू झालो तर एखाद्या बागेत जाईन आणि नुसता या फुलावरून त्या फुलावर बागडत राहीन. फुलावर बागडणे मला खूप आवडते. खर तर फुलांशी खेळणे हेच तर माझे जीवन आहे. माझे रंगीबेरंगी व विविधरंगी पंख पाहून अनेकांना हेवा वाटते. गुलाब, मोगरा, जाई, पारिजातक इत्यादी फुले केवळ एकरंगी असतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक रंग मला लाभले आहेत. झेनियाची फुले मात्र माझ्याशी रंगाच्या बाबतीत स्पर्धा करणारी आहेत. पण मला घेता येतो त्या त्यांना रसास्वाद घेता येत नाही. मी जीवनाचा खराखुरा आस्वाद घेईन. इतर पक्ष्यांसारखा नुसता हवेत उडणार नाही. जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कुणाशी तरी मैत्री जोडावी लागते. फुलांशी मी कायम मैत्री करीन. एक मुलगी तर मलाच विविधरंगी फूल समजून मला तोडायला माझ्याजवळ आली. मी पटकन उडलो. तेव्हा तिच्या लक्षात आले की मी फूल नसून फुलपाखरू आहे. पण याच घटनेने आपण फुलापेक्षाही सुंदर दिसतो. याची जाणीव मला झाली आणि मला माझ्या रंगांचा अभिमानही वाटला. आमचे आयुष्य फारच अल्प असते. पण त्याचे मला मुळीच दुःख वाटत नाही. कारण जीवन किती जगलो यापेक्षा ते कसे जगलो हेच महत्त्वाचे असते.