Advertisements
Advertisements
प्रश्न
मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची।
या ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर
संत एकनाथांनी ‘विंचू चावला’ हे लोकप्रिय असे भारूड लिहिले असून या भारूडाद्वारे त्यांनी पारमार्थिक नीतीची शिकवण दिली आहे.
इंगळी म्हणजे विंचवाची जात असून इंगळीचा गुणधर्म म्हणजे इतरांना दंश करून विषबाधित करणे की ज्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीला असह्य अशा भयंकर वेदना होतात. समाजामध्ये विंचवापेक्षाही विषारी, अतिशय घातकी माणसे वावरत असून ज्यांना दुर्जन म्हटले जाते अशा लोकांसाठी ‘मनुष्य इंगळी’ ही प्रतिमा संत एकनाथांनी योजली आहे. या दुर्जन व्यक्ती अतिशय वाईट असून त्या कधीच सुधारत नाहीत. सद्वर्तनी लोक हे दुर्जन व्यक्तींच्या सहवासात आले की तिचे भयंकर नुकसान होते. वाईट समयी, विचार, आचार यामध्ये तो खचून जातो, योग्य असा मार्ग सापडत नाही. त्यामुळे अशा दुर्जनांपासून सर्वसामान्यजनांनी दूर राहावे, सत्त्वगुणांची जोपासणा करावी की ज्यामुळे इतरांचाही विकास होईल. त्यादृष्टीने हे रूपकात्मक भारूड महत्त्वाचे ठरते.
थोडक्यात संत एकनाथांनी पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तात्कालीन सामाजिक स्थितीचा, जनसामान्यांचा अभ्यास करून काही मानवी प्रवृत्ती कशा दुष्ट आहेत हे रूपकाच्या माध्यमातून विशद केले आहे. ढोंगीपणा, लुबाडणूक, अन्याय, अंधश्रद्धा यामध्ये पिसत असलेल्या सामान्यजनांचा, त्यांच्या मानसिकतेचा व त्यातून संत एकनाथांना आलेल्या अनुभवाचा अंतर्मुख होऊन विचार केला असून सद्वर्तनी लोकांना दुर्जनांपासून दूर राहण्याचा उपदेश केला आहे.