मराठी

‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

बातमीमध्ये घडलेली घटना मर्यादित असले तर त्या घटनेसंबंधीचा तपशील, इतरगोष्टी वृत्तलेखनातून पूर्ण केल्या जातात. म्हणेजे वृत्तलेख घडलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो. वृत्तलेख हा स्वतंत्र तसेच आकर्षक आणि वाचकांना खिळवून ठेवणारा असतो. तसेच वृत्तलेखन  ज्ञान, माहिती, आनंद देणारा व मनोरंजन करणाराही असतो. शिवशाही व स्विफ्ट यांच्या भीषण अपघातात नऊ जनांचा जागीच मृत्यू. दिनांक २३-४-२०१९ रोजी ‘सोलापूर ते रोहा’ असा प्रवास करणारी शिवशाही बस व स्विफ्ट MH-14, K-04 या गाडीचा खोपोली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच नऊ जनांचा मृत्यू झाला व सुदैवाने दोन वर्षाचे एक बालक मात्र जिवत राहिले. त्यास कसलीही इजा झाली नाही.

सोलापूरहून सकाळी ९:३० वाजता शिवशाही बस ४० प्रवाशांना घेऊन रोहाला निघाली. तीच बस पुण्यातून तीन वाजता रोहाकडे जात असता. खोपोली घाटात समोरून येणाऱ्या स्विफ्टने बसला जोराची धडक देऊन, ती गाडी १० ते १५ फूट उंच उडून दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की त्या गाडीतील एकूण सहा प्रवाशांपैकी ५ जनांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यातील एका दोन वर्षाच्या बालकाचे प्राण वाचले. तर शिवशाही बस मधील चार प्रवासी जागीच ठार झाले. हे प्रवासी साठ वर्षापेक्षा वयाने जास्त असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्विफ्टगाडीचा चालक पुण्यातील रहिवासी असून गाडीतील सर्व प्रवाशी पुणे येथील कोथरूड भागात डी. एस. केकॉलनीत राहणारे कुटुंबीय असून या एकाच कुटुंबातील पाचही व्यक्तीचा जागीच दुर्देवी मृत्यु झाला यामध्ये तीन पुरुष ड्रायव्हरसह व दोन स्त्रियांचा समावेश होता. एवढ्या मोठ्याभीषण अपघातांतून दोन वर्षाचे बालक मात्र चमत्कारितरित्या बचावले. अपघात घटनास्थळी स्थानिकांनी एकच गर्दी केली मात्र वेळीच पोलीस पथक पोहोचल्याने त्यांनी गर्दीला आवर घालून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत कशी करता येईल याचाही त्यांनी हालचाली सुरू केल्या.

shaalaa.com
वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×