Advertisements
Advertisements
प्रश्न
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
उत्तर
आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. मुक्त व न्याय निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगासमोर असलेली आव्हाने पुढीलप्रमाणे:
- आर्थिक गैरव्यवहार: निवडणुकांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो.
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण: काही उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट देतात. असे उमेदवार निवडूनही येतात. यामुळे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी निर्माण होतात.
- निवडणुकीमध्ये होणारी हिंसा: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले जात असल्याने निवडणुकीत होणाऱ्या हिंसेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
- कौटुंबिक मक्तेदारी: राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहावा, म्हणून राजकारणी आपल्या नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतात.
संबंधित प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:
मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः