Advertisements
Advertisements
प्रश्न
मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.
उत्तर
मुलाखत म्हणने पूर्वनियोजित संवाद असला तरी तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. ही मुलाखत मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी घेतली जाते. व्यक्तीकार्य, व्यक्तीची संघर्षगाथा, व्यक्तीचे कार्यकर्तत्व, त्याच्यातील माणूसपण जाणून घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. सर्वसाधारणपणे मुलाखत घेण्यासाठीचे टप्पे पाहता मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, मुलाखतीचा समारोप इत्यादीचा समावेश होतो. त्यामध्ये मुलाखतीचा मध्य विशेष महत्त्वाचा असून मुलाखत घेत असताना या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी लागते. मुलाखतीचा मध्य-मुलाखतीची सुरुवात केल्यानंतर हलके-फुलके प्रश्न विचारून करावी.
मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुनावला म्हणजे मुलाखतीच्या मध्याकडे विशेष लक्ष वेधता येते. मुलाखत घेत असता प्रश्नांची यादी समोर असल्याने मुलाखतीचे स्वरूप प्रश्नामागे प्रश्न असे नसावे वा फक्त प्रश्नोत्तरचेही स्वरूप नसावे. तर मुलाखत घेणारा व देणारा या दोघांमध्ये उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर मिळणाऱ्या उत्तराचा धागा पकडून पुढील प्रश्न तयार करता यायला हवेत. हे करत असता विषयांतर होणार नाही याचीही दखल घेतली पाहिजे. प्रश्नांमध्ये विविधता असली पाहिजे ज्यामुळे मुलाखत रंगतदार होईल. प्रश्नांतून उत्तर उत्तरांतून प्रश्न-प्रश्नांची उत्तरे-उत्तरांचे प्रश्न अशा मालिकेतून मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगत जातात. मात्र असे करत असताना मुलाखतीच्या विषयाचा संदर्भ व मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक कशी होईल याकडेही लक्ष द्यावे परंतु ती रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटू नये हे लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे असते.
प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचे कार्य, व इतरही संबंधित पैलू उलगडले पाहिजेत. विषयाचे, व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्या व्यक्तीच्या विचारधारेचे सर्व कंगोरे समोर येत असताना मुलाखत हळूहळू सर्वोच्च बिंदूकडे गेली पाहिजे. मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला बोलण्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. त्यास अधिकाधिक व्यक्त होऊ दिले पाहिने. त्यासाठी प्रश्नांची गुंफणही कुशलतेने केली गेली पाहिजे. जेणेकरून मुलाखतदात्याचा उत्तरे देतानाचा उत्साह वाढत जाईल. या टप्प्यावर मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे, विषयासी संबंधित थेट प्रश्न विचारले जावेत कारण मुलाखतीच्या माध्यमातून जो विषय, जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असते ती याच टप्प्यावर. अशाप्रकारे मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी काळजी घ्यावी लागते.